पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानच्या आर्मी चीफचा हात; पाकच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचा दावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “जम्मू काश्मीर येथील पहलगाम भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 28 पर्यटकांना जीव गमवावा लागला. धर्म पाहून हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला.
त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक निर्बंध लावण्यास सुरूवात केली. तर पाकिस्तानच या हल्ल्यामागे असल्याचे बोलले जात होते. पण, तशी कोणतीही जबाबदारी आतंकवादी संघटनेने घेतली नव्हती. अशातच एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी आदिल राजा यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांच्या मते, ‘पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा हात आहे. असा थेट दावा त्यांनी केला. असीम मुनीरने आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी हा हल्ला केला. आयएसआयने त्याला असे करण्यापासून रोखले होते. परंतु, त्याने कोणाचेही ऐकले नाही, असा दावा त्यांनी एका व्हिडिओद्वारे केला आहे.
पंतप्रधान मोदींनी पुन्हा दिला दहशतवाद्यांना इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यानंतर अनेक मोठे निर्णय़ घेतले. तर आज एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुन्हा दहशतवाद्यांना इशारा दिला. ते म्हणाले की, दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे. यावर आपण एकमत आहोत. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपती लॉरेन्को आणि अंगोलाने व्यक्त केलेल्या शोकसंवेदनाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पंतप्रधान पुढे म्हणाले की, दहशतवाद्यांवर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. तशी पाऊले आगामी काळात आम्ही करत आहोत.
पहलगाम हल्ल्यावर NIAच्या तपासात काय आले समोर?
पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर एनआयएकडून तपास सुरू करण्यात आला. त्यांच्या आलेल्या अहवालात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. यात म्हटले आहे की, आठवडाभरापूर्वी म्हणजेच जवळपास 15 एप्रिल रोजीच दहशतवादी भारतात घुसले होते. त्यांना स्थानिक संशयित आरोपी नेटवर्क, हालचाली आणि रेकीसाठी मदत करत होते. दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये बैसरन, आरू व्हॅली, बेटाब व्हॅली आणि एक मनोरंजन पार्क अशा चार ठिकाणांची रेकी केली होती. त्यानंतर सुरक्षा व्यवस्था कमी असल्यामुळे बैसरनची निवड त्यांनी केली व अखेर हल्ला घडवून आणला, असा अहवालातून समोर आले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..