आजपासून राज्यात सर्वत्र पावसाचा अंदाज; विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व सरी….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “शनिवारपासून पुढे चार ते पाच दिवस राज्यातील बहुतांश भागांत वळवाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी सुरू होतील, असा अंदाज आहे.
दरम्यान, राज्यात उकाडा कायम असून, शुक्रवारी अकोला, जळगाव, सोलापूर येथील कमाल तापमान 44, तर पुणे शहरात यंदाच्या मे महिन्यातील विक्रमी 43 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
राज्याचे शुक्रवारचे कमाल तापमान
अकोला 44.5, जळगाव 44.2, सोलापूर 44.1, पुणे (लोहगाव 43, शिवाजीनगर 41.2), मुंबई (कुलाबा) 34.1, सांताक्रूझ 33.9, अलिबाग 35.7, रत्नागिरी 33.5, कोल्हापूर 38.5, महाबळेश्वर 33.1, मालेगाव 42.2, नाशिक 40, सांगली 41, सातारा 41.2, धाराशिव 42.4, छ. संभाजीनगर 42, परभणी 41.6, बीड 42.9, अमरावती 42.8, बुलडाणा 40.8, ब्रह्मपुरी 42.2, चंद्रपूर 41.8, गोंदिया 37.9, नागपूर 41.6, वाशिम 42.6, वर्धा 42.1, यवतमाळ 41.6.
असे आहेत पावसाचे यलो अलर्ट
कोकण (5 ते 8 मे)
मध्य महाराष्ट्र (3 ते 8 मे)
मराठवाडा (3 ते 8 मे)
विदर्भ (3 ते 6 मे)