कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्याकडून गडकरींचा ‘ त्या’ वक्तव्याची आठवण….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “काँग्रेस पक्षाने आणि ओबीसी समाजाने सातत्याने जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर केंद्र सरकारने जातनिहाय गणना करण्याचा निर्णय घेतला. त्याचे राजकीय पक्ष, सामाजिक आणि ओबीसी संघटनांनी स्वागत केले आहे.
ब्रिटिश सरकारने १९३१ मध्ये जातगणना केली होती. देशात त्यावेळी एकूण २७ कोटी लोकसंख्येपैकी १० लाख इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) संख्या ५२ टक्के होती. भाजपचे अध्यक्ष व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जातीनिहाय जनगणनेला कांग्रेसचा विरोध असल्याची टीका केली.
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बावनकुळे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्त्यांची आठवण करून दिली. ते म्हणाले, जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. याची पार्श्वभूमी पाहिली तर राहुल गांधी यांचा हा मोठा विजय आहे. सरकारचे अनेक जुमले आपण पाहिले तसा हा जमला असू नये. हा निर्णय घेण्यासाठी राहुल गांधी यांनी भाग पाडले. संघाचे सरसंघचालक, यूपीचे मुख्यमंत्री योगी आणि काही भाजप खासदारांनी जातीनिहाय जनगणनेचा विरोध केला होता. गडकरी यांनी तर ‘जो करेंगा जात बात उसे मारुंगा लात’ असे वक्तव्य केले आहे.
सरकारच्या शंभर दिवस कार्यकाळा बाबत म्हणाले,हे सरकार निवडून येताना मताची चोरी करून निवडून आलं आहे. ७५ लाख मत कुठून आली याच उत्तर यांनी अजून दिलं नाही. खोक्या आणि बेताल वक्तव करणारे मंत्री या सरकारच्या शंभर दिवसांच्या काळात आपण बघितले. त्यामुळे या शंभर दिवसात जनतेच्या अपेक्षा भंग झाला. पीक विमा योजनेचा रिलायन्स सारख्या कंपनीला लाभ देणे हा योजनेचा उद्देश आहे. काँग्रेसने संघटना वर्ष जाहीर केले. त्यानुसार आवश्यक बदल सुरू केले आहे. हे संघटना वर्ष असल्याने फेरफार आणि आवश्यक बदल वर्षभरात होणार आहेत. पहलगाम हल्ला निंदनीय आहे. या मुद्दयावर सरकारच्या सोबत राहण्याचे काँग्रेसच्या बैठकीत निर्णय झाला.देशात विदेशात देश एक आहे. हे दाखविण्यासाठी सरकारने अधिवेशन बोलवावं ही काँग्रेसची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.