जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. आव्हाड यांनी स्वत: ही माहिती एक्स या समाजमाध्यमावरून दिली आहे.
तसेच धमकी देणाऱ्याचा मोबाईल क्रमांक पोस्ट करुन पोलिसांनी दखल घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वी देखील धमक्या आलेल्या आहेत. शुक्रवारी दुपारी त्यांना पुन्हा एकदा व्हाॅट्सॲप या समाजमाध्यमावर एक संदेश प्राप्त झाला होता. या संदेशामध्ये त्यांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. तसेच आव्हाड यांनी दावा केला आहे की त्यांना जीवे मारण्याची धमकीचा संदेश पाठविण्यात आला आहे. हे प्रकरण त्यांनी ठाणे पोलीस आणि डीजीपी महाराष्ट्र यांना एक्स या समाजमाध्यमावर ट्विट केले आहे. तसेच त्यांनी धमकी देणाऱ्याचा मोबाईल क्रमांक देखील त्यांच्या पोस्टमध्ये स्क्रीनशाॅट द्वारे पाठविला आहे.
यापूर्वी देखील धमक्या
आव्हाड यांना यापूर्वी देखील अनेक धमक्या आलेल्या आहेत. गेल्यावर्षी देखील त्यांना धमकी आली होती. त्यासंदर्भात गेल्यावर्षी तक्रार दिली होती की, त्यांच्या ठाणे येथील नाद बंगला या निवासस्थानी असताना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून त्यांना संपर्क साधण्यात आला. आपण रोहीत गोडारा बोलत असून बिष्णोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा त्याने केला. त्यानंतर त्याने आव्हाड यांच्याकडे त्याने दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. खंडणीची रक्कम दिली नाही, तर अभिनेता सलमान खान याचे झाले तसे तुझे करू अशी धमकी त्याने दिली. त्यावेळी आव्हाड यांच्या एका पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आता पुन्हा एकदा धमकी आल्याने काय कारवाई होते याबबत लक्ष लागून आहे.

ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”