सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? न्यायालयाने बजावली नोटीस, नेमकं कारण काय?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित खटल्या संदर्भातील आरोपपत्र दाखल केलं.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जातं.
दरम्यान, आता दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने गुरुवारी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना या नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित सुनावणीसाठी नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतरांचे नाव ईडीनेआरोपपत्रात घेतलं आहे, त्या सर्वांना सुनावणी घेण्याचा अधिकार असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ मे रोजी होणार आहे. .
दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने नमूद केलं की हा खटल्याबाबत ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्याविरुद्ध खटला औपचारिकपणे सुरू करायचा की नाही हे न्यायालय ठरवण्यापूर्वी त्यांना सुनावणीचा विशेष अधिकार आहे. निष्पक्ष सुनावणी सुनिश्चित करण्यासाठी नोटीस जारी करण्याची आवश्यकता असल्याचं न्यायालयाने म्हटलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरण काय आहे?
या याचिकेत आरोप करण्यात आले की, गांधी कुटुंबाने यंग इंडियन लिमिटेड (वायआयएल) नावाच्या कंपनीच्या माध्यमातून नॅशनल हेराल्डची प्रकाशक कंपनी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल)ची संपत्ती विश्वासघात आणि फसवणूक करून ताब्यात घेतली. ईडीच्या आरोपांमध्येही या मालमत्तांच्या संपादनाशी संबंधित गैरव्यवहार आणि फसवणुकीचे दावे करण्यात आले आहेत. या कंपनीच्या मालमत्तांमध्ये दिल्ली, मुंबई व लखनऊमधील प्रमुख मालमत्तांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे दिल्लीच्या मध्यभागी असलेल्या बहादूर शाह जफर मार्गावरील प्रतिष्ठित हेराल्ड हाऊसचादेखील यात समावेश आहे. या प्रकरणात ईडीने आपल्या चौकशीचा वेग वाढवला आहे.
गेल्या काही वर्षांत ईडीने आपली चौकशी तीव्र केली आहे. २०२३ मध्ये ईडीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड आणि यंग इंडियनशी संबंधित ७५२ कोटी रुपयांच्या मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. ११ एप्रिल २०२५ रोजी ईडीने ६६१ कोटींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आता त्यांनी मनी लाँडरिंग आरोपपत्रात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नावांचा समावेश केला आहे.

ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”