पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घनेने देशभरात संतापाची लाट आहे. या हल्ल्याचे जशात तसं उत्तर द्यावं, अशी मागणी केली जात आहे.
या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर पाकिस्तानवर कठोर निर्बंध घातले आहेत. (Attack ) प्रत्युत्तरादाखल पाकिस्ताननेही भारताविरोधात काही कठोर निर्णय घेतले आहेत. अशा परिस्थितीत आता राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. तसेच ज्यांच्या कुटुंबांमध्ये शिक्षणाचा , रोजगार हे प्रश्न सोडवण्यासाठी या मृतांच्या नातेवाईकांना शिक्षण आणि शासकीय नोकरी देऊन त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यात येणार आहेत. अशा प्रकारचा निर्णय देखील राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलाय. त्यातून दहशतवादाचा विरोध आणि मृतांच्या नातेवाईकांना पाठींबा देत दहशतवादाचा विरोधी हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Attack) येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होताना दिसत आहे. माहितीनुसार पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात बुकींग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. एका दिवसात 70 टक्केपर्यंत टूर रद्द झाले आहेत.यामुळे जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर आब्दुला (Omar Abdullah) यांनी चिंता व्यक्त केली आहे. पर्यटकांना राज्य सोडताना पाहणे हृदयद्रावक आहे असं मुख्यमंत्री ओमर आब्दुला यांनी म्हटले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..