आमरण उपोषणाच्या तिसऱ्या टप्प्यानंतर प्रशासनाकडून लेखी आश्वासन ; वंचित बहुजन आघाडीचे उपोषण तात्पुरते स्थगित….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
ईसापूर :-. दिनांक 21 एप्रिल 2025 पासून सुरू असलेले ईसापूर ते शेंबाळपिंपरी रस्त्याच्या कामासाठीचे आमरण उपोषण आज प्रशासन व कंत्राटदाराकडून लेखी आश्वासन मिळाल्यामुळे तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, सर्कल प्रमुख सर्जेराव मस्के आणि ईसापूर ग्रामस्थ कासम खान यांनी केले.

लिखित आश्वासनाचे मुख्य मुद्दे:
येत्या 15 दिवसांत 3 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण करणार.
काम सुरू होण्यासाठी लक्षवेधी सूचना कंत्राटदारास दिल्या गेल्या.
स्थानिक ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींच्या समक्ष लेखी आश्वासन देण्यात आले.
रास्ता रोकोचा ठोस दबाव:
आज उपोषणाच्या तिसऱ्या टप्प्यात शेंबाळपिंपरी ते हिंगोली रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. तरीही आंदोलन पूर्णतः शांततेत आणि लोकशाही मार्गाने पार पडले.
प्रशासनाला इशारा:
वंचित बहुजन आघाडीने स्पष्टपणे सांगितले की, दिलेल्या मुदतीत काम सुरू न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल, आणि यावेळी आंदोलनाचा व्याप जिल्हास्तरापर्यंत वाढवला जाईल.
स्थानिकांचा एकमुखी पाठिंबा:
या आंदोलनाला ग्रामपंचायत ईसापूरचा जाहीर पाठिंबा असून, सर्वसामान्य ग्रामस्थ, महिला, शेतकरी, युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..