ठाकरे बंधूंकडून युतीचे संकेत, मनसेचा बडा नेता नाराज, म्हणाला अशी अभद्र…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वापुढे भांडणं, वाद या क्षुल्लक गोष्टी असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या या वक्तव्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ‘मी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी मी एकत्र यायला तयार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या भूमिकेचं शिवसैनिकांकडून आणि काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून देखील स्वागत होत आहे. मात्र मनसे नेते अमेय खोपर यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. ‘अशी अभद्र युती होऊ नयेत, हीच ईश्वर चरणी प्रार्थना’ असं खोपकर यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
युतीसंदर्भात बोलताना राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “कुठल्याही मोठ्या गोष्टी, आमच्यातले वाद, आमची भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्त्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी ही भांडणं, वाद अत्यंत क्षुल्लक गोष्टी आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं या फार कठीण गोष्टी आहेत, असं मला वाटत नाही,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील युतीचे संकते देण्यात आले आहेत. मी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी मी एकत्र यायला तयार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काळात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून देखील राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं स्वागत करण्यात आलं आहे.