आज सूर्य आग ओकणार, ‘या’ 9 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यातील तापमानात सतत वाढ होत आहे. राज्यातील बहुतांशी भागातील तापमान 42 अंशांच्या पुढे गेले आहे. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकताना दिसणार आहे.
त्यामुळे हवामान विभागाने राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच आज राज्यातील काही भागांमध्ये उकाडाही जाणवण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच राज्यातील उर्वरित भागात हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
‘या’ भागात उकाडा जाणवणार
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे उत्तर मध्य महाराष्ट्रापासून मराठवाडा, कर्नाटक, तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचे पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे आज राज्यात अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. त्यामुळे काही भागात उकाडाही जाणवण्याची शक्यता आहे.
अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद
अकोला येथे राज्यातील सर्वाधिक 44.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर धुळे, यवतमाळ आणि चंद्रपूर येथे 43 अंश, तसेच जळगाव, जेऊर, मालेगाव, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, अमरावती आणि वाशीम येथे 42 अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदवण्यात आले आहे. त्याचबरोबर राजस्थानच्या बिकानेरमध्ये देशातील सर्वाधिक 45.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
दिल्लीत पावसाची शक्यता
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत आज हलक्या पावसासह धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. संध्याकाळी ताशी 40-50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात पावसाचा जोर वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीकरांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..