बी. आर. गवई होणार भारताचे दुसरे दलित सरन्यायाधीश…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “बी. आर. गवई हे भारताचे दुसरे दलित मुख्य न्यायाधीश होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी केंद्रीय कायदा मंत्रालयाला न्यायमूर्ती बी.आर. गवई यांना सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस केलीयं.
न्यायमूर्ती बी.आर.गवई 14 मे 2025 रोजी शपथ घेणार असून संजीव खन्ना 13 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.
मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना 13 मे रोजी सेवानिवृत्त होणार असून दुसऱ्याच दिवशी बी. आर. गवई मुख्य न्यायाधीशपदाचा पदभार स्विकारणार आहेत. गवई हे देशातील दुसरे सरन्यायाधीश असणार आहे. याआधी न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन पहिले दलित मुख्य न्यायाधीश बनले होते.
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बी. आर. गवई यांना शपथ देणार असून न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या सेवानिवृत्तीनंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी नोव्हेंबर 2024 पासून पदभार सांभाळला. भूषण रामकृष्ण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 अमरावती येथे झाला. 16 मार्च 1985 रोजी त्यांचा बारमध्ये समावेश झाला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..