बौद्ध विहारच्या जागेवर केलेले अतिक्रम हटवून त्या जागेवरती भीम जयंती आनंद उत्सवात साजरी करण्यात आली ; भीम आर्मी ने दिलेल्या निवेदनाची घेतल्या गेली तात्काळ दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- कुंभारी येथील ग्रामपंचायत येथे नोंद असलेल्या बौद्ध समाज मंदिराच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन भीम आर्मी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अशोक भालेराव यांनी व कुंभारी येथील सर्व बांधव व गावकरी यांच्या कडून उपविभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन देण्यात आले होते
कुंभारी येथील दलीत वस्ती अंतर्गत समाज मंदिर अतिक्रम करणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी.या सर्व जागेचा ताबा हा समाज मंदिराच्या नावाने असल्याने ग्रामपंचायत कार्यालय कुंभारी येथे नोंद आहे तरी त्या ठिकाणी गावातील एका व्यक्तीने त्या जागेवरती अतिक्रम करून त्या जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता त्याबद्दल भीम आर्मी व कुंभारी येथील सर्व गावकरी मंडळी यांनी उपविभागीय अधिकारी पोलीस यांना याबद्दल निवेदन दिले होते निवेदनाची तात्काळ दखल घेऊन पोलीस उपभागीय अधिकारी हर्षवर्धन बीजे साहेब यांनी कुंभारी या गावी भेट दिली कुंभारी येथील ग्रामसेवक यांनी
अतिक्रम केलेल्या व्यक्तीला तात्काळ नोटीस देऊन अतिक्रम हटवून जागा मोकळी करून देण्यास सांगितले , नोटीस मिळतात अतिक्रम हटवण्यात आले आणि त्याच ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आनंद उत्सव मध्ये साजरी करण्यात आली दिलेल्या निवेदनाची प्रशासनाने तात्काळ दखल घेतल्याबद्दल गावकरी व भीम आर्मीने त्यांचे आभार मानले
या कार्यक्रमाला कुंभारी येथील सौ अर्चना पवार सरपंच यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केले संविधानाच्या माध्यमातून ते अधिकार स्त्रियांना प्राप्त झाले असे त्यांनी आपल्या भाषणातून कुंभारी येथील लोकांना मार्गदर्शन केले प्राचार्य दत्तराव पवार यांनी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले डॉ रमेश पवार व अश्विनी देशमुख साहेब यांचे सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन लाभले भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांनी आपल्या भाषणांमधून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामधून शोषित पिढीत समाजाला व स्त्रियांना अधिकार देण्याचे काम केले समाजाला न्याय हक्क मिळवून देण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब यांनी सर्वांना बहाल केले प्रत्येकाने संविधानाचा अभ्यास करून आपले अधिकार आपले कर्तव्य समजून घेतले पाहिजे याप्रकारे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सौ अर्चना पवार सरपंच कुंभारी , माजी सरपंच रमेश पवार , डॉ प्रकाश पवार माजी सरपंच, शिवाजी देशमुख तलाठी, अनिता काकडे ग्रामसेवक साहेब , ईश्वर जाधव ग्रामपंचायत सदस्य, शेषराव ढोणे उपसरपंच ,प्राचार्य दत्तराव पवार, लक्ष्मी देवकते ग्रामपंचायत सदस्य, राजकुमार भगत, शरद खंदारे, गिरधर कांबळे, प्रसिक कांबळे, गजानन ढोणे ,ज्ञानेश्वर ढोने, पंडित ढोणे, शेषराव ढोणे, बन्सी कन्हे, दीपक ढोले, उद्धव ढोणे, नारायण देवकते, पृथ्वीराज देवकते, मारुती देवकते, गजानन देवकते, पंढरी आवळे, संदीप ढोणे, प्रवीण ढोणे, व गावातील सर्व नागरिक स्त्रिया भीम आर्मीचे कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर जाधव ग्रामपंचायत सदस्य कुंभारी याने केले
आभार अंकुश देवकते प्रदर्शन यांनी केले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..