शरद पवारांना मोठा धक्का, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी घेतलं कमळ हाती, शहापूरमध्ये भाजपची ताकद वाढणार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले होते. तर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला होता.
यानंतर विधानसभा निडवणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. यानंतर महाविकास आघाडीला एकामागे एक धक्के बसत आहे. शहापूर तालुक्याचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी पांडुरंग बरोरा हे भाजपात जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. अखेर आज पांडुरंग बरोरा यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलाय. त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक नेते व पदाधिकाऱ्यांनी देखील प्रवेश केल्याने शरद पवार गटाला शहापूरमध्ये मोठा धक्का बसलाय.
पांडुरंग बरोरा हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. त्यांचे वडील महादू बरोरा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. राष्ट्रवादीमधून पांडुरंग बरोरा हे पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते आमदार झाले होते. आमदार असताना त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. ते शिवसेना शिंदे गटात दाखल झाले होते.
शहापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का
पुढे शिंदे गटातून त्यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. 2024 च्या निवडणुकीत ते थोडक्या मताने पराभूत झाले. निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मात्र ते शहापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात शांत होते. ते भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. आज अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पांडुरंग बरोरा हे भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला शहापुरात मोठा धक्का बसलाय.
मालेगावच्या प्रशांत हिरेंचाही भाजपमध्ये प्रवेश
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मालेगावातील हिरे परिवारातील प्रशांत हिरे यांचा प्रवेश झालाय. संजय घाडगे भाजपात आले आहेत. पांडुरंग बरोरा, शिवाजी देशमुख यांचा प्रवेश झालाय. विखे पाटील यांच्या नेतृत्वात श्रीरामपूरमधील 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय. मी सर्वांचे अभिनंदन करतो. काँग्रेस मोठ्या प्रमाणावर खिंडार होणार आहे. काही आश्चर्यचकित करणारे पक्षप्रवेश काँग्रेसमधून होतील, असे त्यांनी म्हटले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..