ठाकरेंनी प्रवक्ता केलेल्या महिला नेत्याचा 4 दिवसांतच ‘जय महाराष्ट्र’; पतीसह शिंदे सेनेत प्रवेश…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईत आणखी एक धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या सेनेला सुरूंग लावत दोन माजी नगरसेवकांना गळाला लावले आहे.
विशेष म्हणजे ठाकरेंनी चार दिवसांपूर्वी प्रवक्तेपदाची माळ गळ्यात टाकूनही महिला नेत्याने शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई महापालिकेचे माजी नगरसेविका संजना घाडी यांनी रविवारी त्यांचे पती माजी नगरसेवक संजय यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. घाडी यांचा शिंदेसेनेतील प्रवेश ठाकरेंसाठी धक्का मानला जात आहे. काही दिवसांपूर्वी घाडींची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्या पक्षाच्या उपनेत्याही होत्या.
ठाकरेंच्या सेनेकडून चार दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या प्रवक्त्यांच्या यादीत घाडी यांचे नाव नव्हते. त्यामुळे त्या नाराज झाल्याची जोरदार चर्चा रंगली. त्यानंतर यादी दुरूस्त करून या यादीत घाडींचे नाव समाविष्ट करण्यात आले. पण पहिल्या यादीत नाव नसल्याने दुखावलेल्या घाडी यांची नाराजी अखेरपर्यंत दूर झाली नाही. त्यामुळे त्यांनी शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर घाडी दाम्पत्य सुरूवातीपासूनच ठाकरेंसोबत राहिले. त्यामुळे ठाकरेंनी त्यांना प्रवक्ते तसेच उपनेतेपद दिले होते. त्यांचा दहिसर, मागाठाणे आधी विधानसभा मतदारसंघात दबदबा आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाला या दाम्पत्यावरच अवलंबून राहावे लागणार होते. पण त्या दोघांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केल्याने या भागात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
ठाकरे यांना मागील काही दिवसांत अनेक धक्के बसले आहेत. अनेक माजी आमदार, नगरसेवकांनी त्यांची साथ सोडली आहे. बहुतेकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत ठाकरेंची साथ सोडली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंकडून ठाकरेंना आणखी धक्के मिळण्याची शक्यता आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..