‘काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय…’, अजित पवारांच्या वक्तव्याची महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा..!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “लोकसभा निवडणुकीच्याआधी राष्ट्रवादीत फूट पडली. अनेक आमदार, खासदार अजित पवार यांच्यासोबत गेले. यानंतर पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे राहिले. विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश मिळाले आणि अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले.
शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला गेला. यानंतर काका-पुतण्या यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली. दरम्यान अजित पवारांनी बारामतीला असताना काकांना उद्देशून एक विधान केलंय. या विधानावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरु आहे.
बारामतीती एका कार्यक्रमात रस्त्यांच्या प्रश्नांबाबत बोलताना अजित पवारांनी एक मिश्किल टिप्पणी केलीय. ‘रस्त्याच्या कामांबाबत काकाला विश्वासात घ्या. कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं. त्याशिवाय पुढे चालत नाही’, असं अजित पवारांनी म्हटलंय.
अजितदादांच्या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. यानंतर बोलताना अजितदादांनी आपण काका कुतवलांबाबत बोलल्याचं म्हटलंय.नाहीतर लगेच तुम्ही म्हणाल ‘दादा घसरले, दादा कोणावर घसरले नाहीत’, असंही अजित पवार मिश्किलपणे म्हणालेत.
एकनाथ शिंदेंकडून अर्थखात्याची शाहांकडे तक्रार?
आमच्या अर्थ खात्याच्या फाइल्स क्लिअर होत नाहीत. अशी तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांकडे केल्याची माहितीय. यावर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलीय. एकनाथ शिंदे आणि आपले चांगले संबंध असल्याचं अजित पवार म्हणालेत. तर शिंदेंना काही तक्रार असल्यास ते आपल्याकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे बोलतील. असंही त्यांनी म्हटलंय.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..