राजकारणी, अधिकारी १० टक्के भ्रष्टाचारी, गणेश नाईक यांचं विधान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “लोकांची कामे होत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये खदखद, क्रोध आहे. कामे होण्यासाठी लोक जनता दरबारामध्ये आपला रोष व्यक्त करतात. याला १० टक्के भ्रष्ट असलेले प्रशासनातील अधिकारी आणि राजकीय नेते जबाबदार असल्याची प्रांजळ कबुली राज्याचे वनमंत्री आणि ठाण्याचे संपर्कमंत्री गणेश नाईक यांनी शुक्रवारी दिली.
नाईक ठाण्यातील जनता दरबारात बोलत होते. शेवटच्या टोकापर्यंत जाऊन तक्रारदारांना न्याय देण्याचे काम व्हायला हवे, असे आदेश पोलिसांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना नाईक यांनी दिले.
शुक्रवारी डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात नाईक यांचा जनता दरबार आयोजित केला होता. नाईक म्हणाले की, पालघरमध्ये दरबारातील ८० टक्के प्रश्न मार्गी लागले. नवी मुंबईतही असेच यश आले. ठाण्यात ६० टक्के यश आले.
…तर जनताच ठाण्याचा महापौर ठरवेल
जो पक्ष जनतेला आवडेल त्या पक्षाचा महापौर होईल. यापूर्वीही नवी मुंंबई स्थापन झाल्यापासून गणेश नाईकांचा महापौर झाला. भाईंदर, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरातही महापौर झाला. आता ठाण्यात निवडणुका लागतील, त्यावेळी बघू, असा अप्रत्यक्ष टोला नाईक यांनी शिंदेसेनेला लगावला. आपण महापौर पदाबाबतचा दावाही केला नाही तसेच इथे स्पर्धा नसल्याची सारवासारवही त्यांनी केली.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….