तुमच्या शहरात किती आहे तापमान…?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. नागरिकांना घराबाहेर पडावे की नाही असा प्रश्न पडत आहे. अनेक ठिकाणी तापमानात मोठी वाढ झाली आहे.
अकोला शहर मागील तीन दिवसांपासून राज्यातील सर्वात उष्ण शहर ठरत आहे. जिथे कमाल तापमान 44 अंश सेल्सिअसवर पोहोचले. त्या पाठोपाठ आता अमरावतीमध्ये ही तापमानाचा पारा चढला असून तो 43 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. त्यातच आता पुण्याच्या तापमानात वाढ झाली आहे. पुण्यात आज 42 अंश सेल्सिअस तापमान झालं आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे.
या शहरांतील तापमानात वाढ
अकोला, अमरावती, पुणे, नागपूर, जळगाव, नाशिक, सोलापूर, परभणी, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या शहरांमध्येही तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये):
अकोला: 44.1 (Akola Temperature)
पुणे: 41.0 (Pune Temperature)
अहिल्यानगर : 40.1 (Ahilyanagari Temperature)
जळगाव: 43.3 (Jalgaon Temperature)
नाशिक: 41.0 (Nashik Temperature)
सोलापूर: 41.8 (Solapur Temperature)
अमरावती: 43.0 (Amravati Temperature)
बुलढाणा: 40.6
वाशिम: 42.0
चंद्रपूर: 42.6
नागपूर: 40.8 (Nagpur Temperature)
वर्धा: 40.6
यवतमाळ: 41.0
छत्रपती संभाजी नगर : 41.6
परभणी: 41.3 (Parbhani Temperature)
गोंदिया – 39.2
मुंबई – 34.6 (Mumbai Temperature)