जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात १७ वर्षांनंतर न्याय, ४ दहशतवाद्यांना जन्मठेप ; झाला होता ७१ जणांचा मृत्यू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जयपूर :- “जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी चार दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जयपूरच्या विशेष न्यायालयाने मोहम्मद सैफ, मोहम्मद सरवर आझमी, सैफुर्रहमान आणि शाहबाज अहमद यांना दोषी ठरवले होते.
यानंतर त्यांना मंगळवारी (८ एप्रिल) ही शिक्षा सुनावण्यात आली.
झाला होता ७१ जणांचा मृत्यू –
१३ मे २००८ रोजी जयपूर येथे एकापाठोपाठ एक असे आठ बॉम्बस्फोट झाले होते. एक बॉम्ब चांदपोल बाजारातील एका मंदिराजवळ सापडला होता. जो निकामी करण्यात आला. या साखळी बॉम्बस्फोटात ७१ जणांचा मृत्यू झाला होता.
१७ वर्षांनंतर मिळाला न्याय –
जयपूर बॉम्बस्फोटाशी संबंधधित प्रकरणांत चौघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर, राजस्थान उच्च न्यायालयाने मार्च २०२३ मध्ये सर्वांना निर्दोष सोडले होते. १७ वर्षे जुन्या या प्रकरणात, सरकारी वकिलांनी ११२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले, तर सुमारे १२०० कागदपत्रे न्यायालयात सादर केली. यानंतर न्यायालयाने मंगळवारी (८ एप्रिल) ६०० पानांचा निकाल दिला.
तीन आरोपी अद्यापही फरार –
या प्रकरणात पोलिसांनी एकूण १३ झणांना आरोपी केले होते. यांतील तीन जण अद्यापही फरार आहेत. तर दोन जण हैदराबाद आणि दिल्लीतील कारागृहात आहेत. तर दोन जण दिल्लीतील बाटला हाऊस एनकाउंटरमध्ये मारले गेले होते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….