औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नाव बदलणार, संजय शिरसाटांची घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
खुलताबाद :- “गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा वाद चर्चेत आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी मागणी करत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
अशातच राज्याचे समाजकल्याणमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नाव बदलण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकीकडे राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा वाद सुरु असतानाच शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री संजय शिरसाट यांनी मोठी घोषणा केली आहे. औरंगजेबची कबर असलेल्या खुलताबादचे नामांतर होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच खुलताबादसह दौलताबादचे नामांतर होणार असल्याचेही ते म्हणालेत.
सध्या औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नाव रत्नापुर असे करणार असल्याचे ते म्हणालेत. तसेच पूर्वी या गावाचे नाव रत्नापूरच होते मात्र औरंगजेबाने ते बदलून खुलताबाद असे केले. दौलताबादचेही नाव पूर्वी देवगिरी असे होते. औरंगजेबाने बदलून दौलतापूर केले. औरंगजेबाने केलेल्या कारनाम्याने याची नावे बदलली.
दरम्यान, आम्ही या सर्व गावांची नावे बदलण्याची प्रोसेस सुरु करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजेंचे चांगले स्मारक याठिकाणी बांधण्यात येतील असेही संजय शिरसाट यांनी म्हटले असून औरंगजेबाने केलेल्या सगळ्या गावांची नावे बाद करणार आहोत, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….