‘मला शब्दही फुटत नाही’ भाषण सुरू असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- “मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आयोजित सभेत बोलत असताना अचानक मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली.
भाषण सुरू असताना जरांगेंना अस्वस्थ वाटायला लागलं. त्यामुळे काही वेळ भाषण थांबवले. भाषण संपल्यानंतर मनोज जरांगे यांना तातडीने रुग्णवाहिकेनं हॉस्पिटलला नेण्यात आलं आहे.
बीड शहरातील मराठा मेळावा आणि बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बीडमधील शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, केमिस्ट, वकील, इंजिनिअर आणि कर्मचारी संघटनाचा हा मेळावा होता. यावेळी मनोज जरांगे यांच्यासह व्यासपीठावर धनंजय देशमुख उपस्थितीत होते. भाषणाला सुरुवात केल्यानंतर अचानक जरांगे यांना अस्वस्थ वाटायला लागलं. त्यामुळे त्यांनी भाषण थांबवलं. मला शब्दही फुटत नाही, असं म्हणत त्यांनी भाषण थांबवलं होतं. थोडा वेळ थांबून पुन्हा भाषणाला सुरुवात केली.
यावेळी व्यासपीठावर मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख गहिवरले होते. देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम सांगताना पाटील, देशमुख आणि उपस्थित महिला गहिवरल्या. मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख ही भावूक झाल्याचे पाहण्यास मिळाले. यावेळी समाजाच्या लेकराला संतोष देशमुख यांना काय काय सहन करावा लागलं असं म्हणतात धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीवर जाई पर्यंत शांत बसणार नाही. मराठा समाजाने एकजूट कायम ठेवण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी यावेळी केलं.
भाषण संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली. तातडीने कार्यक्रमस्थळी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. मनोज जरांगे यांना तातडीने रुग्णवाहिकेनं हॉस्पिटलला नेण्यात आलं. शहरातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये मनोज जारंगे पाटील यांच्यावर उपचार सुरू झाले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….