‘कुणाल कामरा हॉटेलमध्ये डान्स बारसारखी संस्कृती आणून हिडीस प्रकार करतोय’; संभाजीराव भिडे संतापले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सांगली :- “रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून जो सध्या वाद सुरू आहे, याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर भिडे यांनी, ”वादाबाबत स्वतंत्रपणे बोलेन. मात्र छत्रपती संभाजीराजे जे बोलले ते चुकीचेच आहे,” अशी टिप्पणी केली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) बलिदानानिमित्त गेले महिनाभर सुरू असलेल्या बलिदान मासची सांगता मूक पदयात्रेने होणार आहे. शनिवारी (ता. २९) सकाळी ७.३० वाजता मारुती चौकातून मूक पदयात्रा निघणार आहे,” अशी माहिती शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (Sambhajirao Bhide) यांनी दिली.
ते म्हणाले, ”फाल्गुन अमावस्येला छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे मारण्यात आले. हिंदवी स्वराज्याच्या संरक्षणासाठी त्यांनी प्राणाची आहुती दिली. तत्पूर्वी त्यांना पकडल्यानंतर औरंगजेबाने त्यांचा अनन्वित छळ केला. महिनाभर छळ करून त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सहन केलेल्या यातना व बलिदानासाठी वंदन करण्यासाठी माघ अमावस्या ते फाल्गुन अमावस्या असा महिना बलिदान मास म्हणून पाळण्यात येतो.”
संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या स्मृती जपण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे धारकरी महिनाभर अनवाणी राहतात. शुभकार्य निषिद्ध, गोड पदार्थ वर्ज्य, एकवेळ जेवण किंवा महिनाभर उपवास करतात. नव्या पिढीला माहिती व्हावी, या उद्देशाने हा बलिदान मास पाळला जात आहे. त्याची सांगता शनिवारी (ता. २९) आहे. मुख्य मार्गावरील मूक पदयात्रेनंतर मारुती मंदिरासमोर श्रद्धांजली वाहण्यात येईल. मूक पदयात्रेत शिवप्रेमी हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने अनवाणी व डोक्यावर काहीही न घालता सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
अन्य प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, ”सध्या राज्यात लोकशाहीच्या नावाखाली काहीही सुरू आहे. आर. आर. आबांनी डान्स बार बंद केले. मात्र कुणाल कामरा हॉटेलमध्ये डान्स बारसारखी संस्कृती पुन्हा आणून हिडीस प्रकार करीत आहे. याच प्रकरणावरून विधिमंडळात सुरू असलेला प्रकार लोकशाहीस शोभा देणारा नाही.” नगरप्रमुख अविनाश सावंत, राहुल बोळाज, बापू हरिदास, धनंजय कोटणीस, अमित चव्हाण, सचिन पवार, दत्तराज मेंगाणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
‘संभाजीराजे छ्त्रपती चुकीचं बोलले’
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून जो सध्या वाद सुरू आहे, याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर भिडे यांनी, ”वादाबाबत स्वतंत्रपणे बोलेन. मात्र छत्रपती संभाजीराजे जे बोलले ते चुकीचेच आहे,” अशी टिप्पणी केली. ते म्हणाले, ”वाघ्या कुत्र्याचे स्मारक आहे. त्यातून स्वामीनिष्ठाच प्रतीत होते. काही अभ्यासक म्हणवून घेणाऱ्यांनी इतिहासाची मोडतोड केल्यानेच पेच निर्माण झाला आहे. काहींनी सोयीचा इतिहास घुसडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठीच महान कार्य केले. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे प्रतिरूपच होते.”

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….