मी निवडणूक लढवणार नाही… मुख्यमंत्री योगी यांच्या विधानामुळे उत्तर प्रदेशात राजकीय चर्चा वाढली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लखनऊ :- “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पदाबद्दल प्रतिक्रिया दिली. त्यांच्या उत्तरामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय चर्चा वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका पॉडकास्ट शोमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ज्याचा व्हिडिओ बुधवारी प्रसिद्ध झाला. या पॉडकास्टमध्ये, सीएम योगी यांनी तिसऱ्यांदा यूपीचे मुख्यमंत्री होण्याबद्दल उत्तर दिले. त्यांच्या उत्तरामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय चर्चा तीव्र झाली आहे. तसेच राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की सेवा, सुरक्षा आणि सुशासनाचे मॉडेल आमच्या पक्षाचे होते आणि उत्तर प्रदेशात त्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आज जनतेचे व्यापक आशीर्वाद आमच्या पक्षाला आहे.
मुख्यमंत्री योगी काय म्हणाले?
ते म्हणाले की मी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणार नाही. आमचा पक्ष प्रयत्न करेल. भाजपचा कोणताही सदस्य मुख्यमंत्री होऊ शकतो. तसेच माहिती समोर आली आहे की, मुख्यमंत्री योगी यांनी आधीच सांगितले आहे की, एकदा त्यांना या ओझ्यातून मुक्तता मिळाली की ते गोरखपूरला जातील.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….