उद्धव ठाकरेंना धक्का ; ज्येष्ठ नेता सोडणार पक्षाची साथ, उद्या मुंबईत होणार शिंदे गटात पक्षप्रवेश….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली आहे. शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
दरम्यान आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे.शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले उद्धव ठाकरे यांची साथ सोडून उद्या मुंबईमध्ये आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवेश करणार आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असून ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते संदेश कार्ले लवकरच धनुष्यबाण हाती घेणार आहेत. यापूर्वी देखील अहिल्यानगर मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या काही पदाधिकारी आणि नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा अहिल्यानगर मध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांना केवळ 50 जागांवर समाधान मानावं लागलं.सर्वाधिक जागा जिंकत महायुतीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला तर शिवसेनेने शिंदे गटालाही मोठे यश मिळालं. मात्र या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीची ताकद आता कमी होत असल्यास दिसून येत आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….