शेतकऱ्यांसारखी सकारात्मकता कोरोनाच्या भयावर प्रभावी उपाय :डॉ. मिलिंद आपटे
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद-
आज कोरोना मुळे प्रत्येक क्षेत्रात अनिश्चितता निर्माण होऊन समाजाचा प्रत्येक घटक भयग्रस्त झाला आहे.मात्र ज्याप्रमाणे दरवर्षी शेतीत नुकसान होत असले तरी पुढच्या वर्षी पुन्हा शेतीची मशागत करून पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यासारखी सकारात्मकता बाळगल्यास कोरोनाच्या भयावर सहज मात करता येईल असे मौलिक विचार नागपूर येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ मिलिंद आपटे यांनी व्यक्त केले.
पुसद अर्बन बॅंकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या संकल्पनेतून व बँकेच्या सामाजिक उपक्रमातुन कोरोनाचा व्यापारी, कर्मचारी ,शेतकरी व सामान्य जनतेच्या मानसिकतेवर झालेला परिणाम व उपाय या विषयावर आयोजित वेबिनार मध्ये मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की आपली सुदृढ शरीर व प्रतिकार शक्ती टिकवुन ठेवा, शारीरिक व मानसिक धैर्य ठेवा ,नकारात्मक विचाराला टाळा, पायी जास्त चाला ,घटनेनंतर नकारात्मक चर्चा टाळून उपायावर बोला. कोरोनाला जीवनातील विराम समजा पुढील वर्षी सर्व व्यवसाय पुन्हा एकदा भरारी घेवुन देशाची अर्थव्यवस्था कात टाकेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान कोरोनामुळे विद्यार्थांसाठी ऑनलाइन शिक्षण प्रणाली घातक असून कोरोना पर्व संपल्यानंतर त्याचे दुष्परिणाम दिसतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली. बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी प्रास्ताविकात कोरोनामुळे अनिश्चीततेच्या वातावरणात असलेल्या सर्वसामान्य लोकांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने प्रेरीत होऊन वेबिनार आयोजित केल्याचे सांगितले. यावेळी पॅनलिस्ट म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेल अध्यक्ष तथा म.गो.बार कौन्सिल चे सदस्य एड आशिष देशमुख, अ.भा. काँ.कमिटी चे सचिव एड.सचिन नाईक,यवतमाळ जिप च्या माजी अध्यक्ष डॉ आरती फुफाटे, मराठा सेवा संघ राज्य उपाध्यक्ष अरविंद गावंडे तसेच सिंदखेड राजा येथील जिजाऊ श्रुष्टी चे सचिव सचिन चौधरी विश्वनाथसिंह बयास पतसंस्थेचे अध्यक्ष निशांत बयास,चेम्बर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष सुरज डुब्बेवार, उपाध्यक्ष संतोष अग्रवाल,माजी अध्यक्ष बिपीन चिद्धरवार, प्रगतशील कास्तकार अभय गडम ,नारायण क्षीरसागर, पॉलिटिक्स स्पेशल चे मुख्य संपादक रितेश पुरोहित तसेच काळी दौ.येथील माजी सरपंच गौतम रणवीर व तेथील शेतकरी तसेच वालतुर रेल्वे येथील शेतकरी,बँकेचे संचालक सुदीप जैन, गोपालसेठ अग्रवाल,नीलकंठ पाटील, प्रवीर व्यवहारे, बा.ना.अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ अविनाश वानखेडे, ,कृषिभूषण दीपक आसेगावकार यांनी प्रश्नोत्तर सत्रात सहभाग घेतला.सुरवातीचे संचलन बँकेचे संचालक ललित सेता तर आभार प्रदर्शन बँकेचे उपाध्यक्ष राकेश खुराणा यांनी केले.झूम अँप व शरद मैंद लाईव्ह फेसबुक पेज वर हजारो लोकांनी वेबिनार मधील मार्गदर्शनाचा लाभ घेतला.