आरोपीला दिलेली १ कोटींची कॅश आली कुठून? गोरे प्रकरणातल्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचा सवाल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या कटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकांचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
सभागृहात बोलताना खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि प्रभाकर देशमुख आरोपींच्या संपर्कात होते, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या आरोपानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. या सगळ्याशी माझा काय संबंध? असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीचा कट रचण्यात संबंधित महिला आणि कथित पत्रकार तुषार खरात यांचा समावेश होता. मंत्री गोरे यांच्या बदनामीचे व्हिडीओ तयार केल्यानंतर ते आधी सुप्रिया सुळे, रोहित पवार, प्रभाकरराव देशमुख यांना पाठवले जात होते, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. याची चौकशी होईलच पण सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. मी पुराव्यानिशी सांगतो, प्रभाकरराव देशमुख हे शंभरवेळा तिन्ही आरोपींशी बोलले आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा माझं नाव घेतलं तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं. या सगळ्याशी माझा काय संबंध? १ कोटी रुपयांची रोकड मी पाहिली. याची चौकशी त्यांना करायची असेल तर मी पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अनेक नावे घेतली. त्यापैकी कुठल्याच व्यक्तीला मी भेटलेले नाही. मी त्यांना ओळखतही नाही. मला त्यांची नावेही माहिती नाहीत. माझं स्पॉट लोकेशन पत्रकारांनाही माहिती असतं. आजकाल तंत्रज्ञानामुळे, कॅमेऱ्यामुळे कोण कुणाला भेटलं ते लगेच स्पष्ट होतं. मी पारदर्शक आयुष्य जगते. मी कुणाला भेटलेली नाही. मला या विषयाची फारशी माहिती नाही,” असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं.
“माझ्यावर जो आरोप झाला त्याचे मला आश्चर्य वाटलं. माझं आयुष्य आणि माझा मोबाईल पूर्णपणे पारदर्शक आहे. मी पत्रकारांच्या सतत संपर्कात असते. सगळ्या पत्रकारांचे मला फोन येतात, त्यांनी केलेल्या बातमीचे व्हिडीओ माझ्याकडे येतात. तुषार खरातांना मी ओळखते का? तर नक्कीच मी ओळखते. त्यांचं लोकप्रिय यूट्यूब चॅनल आहे. त्यांनी माझी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी मुलाखत देखील घेतली आहे. अर्थातच मी त्यांना ओळखते. लोकं मला बातम्या पाठवतात. मी त्या फॉरवर्ड करते का? तर नाही,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“या प्रकरणामध्ये मी एक विधान केलेलं मला स्पष्ट आठवत आहे. ज्या महिलेवर १ कोटी रुपये घेतल्याचा आरोप झाला, मला चिंता अशी होती की, १ कोटी रुपये कॅश आली कुठून? नोटबंदी झाली होती तेव्हा सगळे बँकिंग सिस्टिममध्ये आले आहेत तर १ कोटी रुपये कॅश आले कुठून? मला चांगल आठवतंय मी प्रसार माध्यमांमध्ये बोलले होते की, मी सदर प्रकरण केंद्राच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे घेऊन जाणार आहे. नक्की व्यवहार झाला कसा? हे सर्वांना समजले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये नाव घेतलेल्या कोणत्याही व्यक्तींला मी कधीही भेटले नाही. मी पारदर्शक आयुष्य जगते,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….