सेवा सोसायटींकडून काम वाटपासाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 20 :- सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने 10 लाख रुपयांपर्यंतची कामे विना निविदा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.
जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा, यवतमाळ कार्यालयामार्फत स्वच्छक, सफाईगार पदासाठी रोज चार तास कामाकरीता 1 लाख 10 हजार 592 रुपयांच्या कामाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या कामासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी दि.19 मार्च सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ या कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु या दि.19 मार्च रोजी 2 प्रस्ताव प्राप्त झाले. आता.दि. 24 मार्च पर्यंत या कार्यालयात प्रस्ताव आणि बंद लिफाफ्यामध्ये दरपत्रक मागविण्यात आले आहे.
उशिरा प्राप्त होणाऱ्या, अपूर्ण स्वरुपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त प.भ. जाधव यांनी केले आहे. प्रस्ताव सादर करण्यासाठी सेवा सहकारी संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, काम करण्यास संस्था सक्षम असल्याचे प्रमाणपत्र, संस्था मागील सहा महिन्यांपासून कार्यरत असल्याचा पुरावा, पुर्वी केलेल्या कामांचा तपशील, मार्च 2024 पर्यंतचे लेखापरीक्षण अहवाल, संस्थेतील सदस्यांची क्रियाशील नोंदणी, संस्थेच्या उपविधीमधील बदलांची सहकार खात्याची मान्यता, शासकीय अनुदान मिळाल्यास विनियोग प्रमाणपत्र आणि लेखापरीक्षण अहवाल, मागील तीन महिन्यांचे बँक स्टेटमेंट, संस्थेतील सर्व सभासदांच्या रोजगार नोंदणीची प्रत, सीलबंद लिफाफ्यात दरपत्रक इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….