2019 पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपीसाठीचा नवा प्रस्ताव….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- “सन एप्रिल 2019 मध्ये खरेदी-विक्री झालेल्या काही वाहनांना विक्रेत्यांकडून एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) मिळालेली नाही. मात्र, आता ती डीलरकडूनही आणि आत्ता नियुक्त केलेल्या नव्या व्हेंडरकडूनही मिळण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत, अशा वाहनधारकांनी आता टेन्शन घेण्याची गरज नाही, याकरिताचा आवश्यक असलेला प्रस्ताव पुणे आरटीओ कार्यालयाकडून परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांना पाठवण्यात आला आहे.
यावर सकारात्मक चर्चा सुरू असून, लवकरच प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मंजुरी मिळाल्यावर एप्रिल 2019 मध्ये एचएसआरपी न मिळालेल्या वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.
काय येत आहेत अडचणी?
एप्रिल 2019 पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांना एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार शहरातील असंख्य वाहनचालक आपल्या वाहनांना एचएसआरपी बसवत आहेत. मात्र, एप्रिल 2019 या महिन्यासह सालातील काही वाहनांना विक्रेत्यांकडून या एचएसआरपी नंबर प्लेट मिळालेल्या नाहीत आणि आता ते या नंबर प्लेट मागण्यास विक्रेत्याकडे जातात, तेव्हा त्या विक्रेत्याकडून मिळत नाहीत. नवीन नियुक्त केलेल्या व्हेंडर (कंपनी) कडूनही संकेतस्थळावर तांत्रिक समस्या येत असल्यामुळे एचएसआरपी काही वाहनधारकांना मिळत नाहीत, ही अडचण शहरातील काही वाहनधारकांसमोर आलेली आहे.
काय आहे प्रस्ताव?
सन एप्रिल 2019 मध्ये खरेदी-विक्री झालेल्या काही वाहनांना विक्रेत्यांकडून एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) मिळालेली नाही, अशा वाहनांनासुद्धा एचएसआरपी बसवणे, बंधनकारक आहे. याकरिता पुणे आरटीओ कार्यालयाकडून या समस्येबाबत तोडगा काढत, एप्रिल 2019 मधील ज्या वाहनांना एचएसआरपी मिळालेली नाही, त्यांना ती नव्या नियुक्त केलेल्या कंपनीकडून (व्हेंडरमार्फत) मिळाव्यात, याबाबतचा प्रस्ताव पुणे आरटीओ कार्यालयाकडून परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांना देण्यात आला आहे.
सेंटर वाढविण्यासाठी कंपनीला पत्र
शहरातील वाहनांसाठी कंपनीची असलेली सेंटरची संख्या अपुरी असल्याचे समोर येत आहे. सध्या पुण्यात 124 सेंटर उपलब्ध आहेत. ती वाढवण्यासाठी आम्ही कंपनीला पत्र दिले आहे. या पत्रात वाहनधारकांना तातडीने सेवा मिळावी, याकरिता एचएसआरपी सेंटर वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, घाई-गडबडीत कसलेही सेंटर उभारू नये. सेंटरची संख्या वाढवताना सर्व गोष्टींची पडताळणी करावी, वाहनचालकांना सेंटर सुरू केल्यावर कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशाही सूचना केल्या आहेत.
स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणेएप्रिल 2019 मधील ज्या वाहनांना एचएसआरपी मिळालेली नाही, त्यांना ती नव्या नियुक्त केलेल्या कंपनीकडून (व्हेंडरमार्फत) मिळाव्यात, याबाबतचा प्रस्ताव पुणे आरटीओ कार्यालयाकडून परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांना देण्यात आला आहे. त्यावर सकारात्मक चर्चा सुरू असून, त्या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….