प्रशिक्षण कार्यशाळेसाठी नाव नोंदविण्याचे आयोजन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 19 :- प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय अमरावतीच्यावतीने अनुसूचित जाती या घटकातील मच्छिमार, विविध योजनेतील लाभार्थी, नवयुवक-युवती, मत्स्यकास्तकार व नव्याने मत्स्यव्यवसाय करू ईच्छिणाऱ्यांसाठी मत्स्यव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान पध्दतीने मत्स्यसंवर्धनाची ओळख या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळा शुक्रवार, दि. 21 मार्च रोजी यवतमाळ येथे होणार आहे. कार्यशाळेकरीता फक्त प्रथम १०० प्रशिक्षणार्थीना भाग घेता येईल. कार्यशाळेत जिल्हा व विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून उपस्थित प्रशिक्षणार्थीना परिपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यशाळेत अमरावती विभागातील भाग घेऊ ईच्छिकांनी प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, अमरावती येथील सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी बालाजी पवार यांच्या ९९६०५६३१०७ व यवतमाळचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अजय मेसरे यांच्या ७७४१०१९३२८ या क्रमांकाशी संपर्क साधून नाव नोंदवावे व कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक उपआयुक्त सुरेश भारती यांनी केले आहे. कार्यशाळेत सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र दिले जाईल.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….