पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि.18 :- भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च पर्यंत वाढविण्यात आली आहे. दहावी मूलभूत शैक्षणिक पात्रता असलेले इच्छुक उमेदवार pminternship.mca.gov.in याअधिकृत वेबसाइट वर विविध इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. या योजनेंतर्गत तरुणांना भारतातील नामांकित 500 कंपन्यांमध्ये व्यावहारिक अनुभव उपलब्ध करून देते.
इंटर्नशिपसाठी अर्जदारांचे वय २१ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे, हायस्कूल, पदवीधर, डिप्लोमाधारक किंवा बीए, बीएससी, बीकॉम, बीबीए, बीसीए, आयटीआय इत्यादी पदवी, पदविकाधारण असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. ऑनलाईन किंवा दूरस्थ शिक्षण कार्यक्रमांमध्ये नोंदणी केलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. अर्जदार पूर्णवेळ नोकरी करत नसावा किंवा पुर्णवेळ शिक्षणात नोंदणीकृत नसावा. ही इंटर्नशिप एक वर्ष चालते, त्यामुळे सद्या पूर्णवेळ काम करत नसलेल्या किंवा अभ्यास करत नसलेल्यांसाठी ही एक संधी आहे. इंटर्नला संपुर्ण १२ महिन्यांच्या कालावधीसाठी दरमहा ५ हजार रुपये स्टायपेंड मिळेल. इंटर्नला सामील झाल्यानंतर थेट त्यांच्या खात्यात जमा होणारे ६ हजार रुपयांचे एक वेळ अनुदान देखील मिळेल. इंटर्नला भारत सरकारच्या विमा योजनांतर्गत संरक्षण दिले जाईल. कोणतेही अर्ज शुल्क नाही. अर्जदारास pminternship.mca.gov.in या अधिकृत PMIS वेबसाइटला भेट देऊन अर्ज सादर करता येईल.
पीएम इंटर्नशिप योजना युवकांना विविध क्षेत्रांमध्ये वास्तविक जगातील व्यवसाय अनुभव मिळविण्यास मदत करणे, त्यांची कौशल्ये आणि कामाची तयारी वाढवते. जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प. भ. जाधव यांनी केले आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….