खंडणीसाठी कराडचे सहावेळा फोन, काही कॉल मुंडेंच्या जगमित्र कार्यालयातून केल्याचा शिंदेंचा जबाब….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- “संतोष देशमुख यांचा खून खंडणीला अडसर आल्यानेच झाल्याचे सीआयडीच्या विशेष तपास पथकाने केलेल्या तपासातून समोर आले. यावरून वाल्मीक कराड हाच खुनाचा सूत्रधार असल्याचा ठपका न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपत्रात करण्यात आला आहे.
वाल्मीक कराडने खंडणीसाठी सहा वेळा फोन केल्याचा धक्कादायक खुलासा दोषारोपपत्रात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे वाल्मीकने खंडणीसाठीचे काही कॉल धनंजय मुंडे यांच्या परळीतील जगमित्र कार्यालयातून देखील केले व याच कार्यालयात त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावल्याचीही नोंद यात आहे.
वाल्मीकने अवादा कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील शिंदे यांना केलेला फोन, सुदर्शन घुलेला केलेला फोन, विष्णू चाटेच्या मोबाइलवरून दिलेली धमकी आणि सुदर्शन घुले प्रकल्पावर जाऊन भांडणावेळी वाल्मीकच्या खंडणीचा दिलेला निरोप, याचा तपशील या दोषारोपपत्रातील पुराव्यांत आहे. मात्र, वाल्मीक कराडने अवादा कंपनीकडे सहा वेळा खंडणी मागितल्याचा जबाब सुनील शिंदे यांनी दिला आहे. पवनचक्की प्रकल्पावरील भांडणावेळी सुदर्शन घुलेनेही ‘तुला बघून घेईल, तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी संतोष देशमुख यांना दिल्याचेही जबाबाबत म्हटलेले आहे.
ता. २९ नोव्हेंबरला वाल्मीक कराड याने विष्णू चाटेच्या मोबाइलवरून सुनील शिंदे यांना दोन कोटींच्या खंडणीची मागणी केल्याच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंद झाला आहे. मात्र, खंडणी मागणीचा सिलसिला ता. २८ ऑगस्ट २०२४ पासून आहे. त्यानंतर ता. ११ सप्टेंबर, ता. आठ ऑक्टोबर, ता. २६ नोव्हेंबर आणि ता. २९ नोव्हेंबरला दोन वेळा व ता. सहा डिसेंबरला खंडणीसाठी धमकावण्यात आले. ता. २६ नोव्हेंबरला सुदर्शन घुले प्रकल्पावर आला व त्यानेही ‘अण्णानी सांगितलेले दोन कोटी रुपये दिले नाही तर बीड जिल्ह्यात कुठेही काम करू देणार नाही, अशी धमकी दिली होती’ असेही शिंदे यांनी जबाबात म्हटले आहे.
जगमित्र कार्यालयात झाली भेट
परळीतील धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयातूनच वाल्मीक कराड सर्व सूत्रे हलवत असे. ता. आठ ऑक्टोबर २०२४ ला वाल्मीक कराड, विष्णू चाटे आणि अवादा कंपनीतील अधिकारी शिवाजी थोपटे यांची परळीतील जगमित्र कार्यालयात भेट झाली होती. याच ठिकाणी वाल्मीक कराडने धमकी दिल्याचा सुनील शिंदेंचा जबाबही या दोषारोपत्रात नमूद आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….