जिल्हाधिकारी विकास मीना यांनी स्वीकारला पदभार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 11 :- जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर शासनाने नव्याने नियुक्त केलेले जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज पदभार स्विकारला. प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पदभार सोपवला.
श्री. मीना हे 2018 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहे. येथे रुजु होण्यापुर्वी ते छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापुर्वी नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथे प्रकल्प अधिकारी सोबतच उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.
श्री.मीना यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात अमरावती जिल्ह्यातून झाली. अमरावती येथे परिविक्षाधिन कालावधीत त्यांनी विविध पदांवर काम केले. आज जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्यासह प्रशासनातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….