कृषी महोत्सव व प्रदर्शनीत १ कोटी ५० लाखावर उलाढाल ; महोत्सवाचा समारोप, प्रयोगशील शेतकरी, महिलांचा सत्कार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि.११ :- येथील समता मैदानात आत्मा, कृषी विभाग व माविमच्यावतीने आयोजित पाच दिवशीय कृषी महोत्सव व प्रदर्शनीचा समारोप झाला. याप्रसंगी प्रयोगशील शेतकरी, महोत्सवातील उत्कृष्ट स्टाँलधारक, स्पर्धेतील विजेते, बचतगटाच्या महिलांचा सत्कार करण्यात आला. या महोत्सवात १ कोटी ५० लाखावर किंमतीच्या खरेदी विक्रीची उलाढाल झाली.
समारोप कार्यक्रमास विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वयक डॉ.रंजन वानखडे, एमएआयडीसीचे विभागीय व्यवस्थापक सत्यजित ठोसरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ मयूर ढोले, कृषी उपसंचालक तेजस चव्हाण, प्रगतिशील शेतकरी गणेश चेलमेलवार, आनंद गोविंदवार, विठ्ठल मालेकर, माविमचे शैलेंद्र जिद्देवार, अक्षय गोसावी आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.लहाळे यांनी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून कमी खर्च व अधिक उत्पादन देणारी शेती तसेच विक्री व्यवस्थापन, शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना राबविणे शक्य होत असल्याचे सांगितले. प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी आपल्या प्रास्ताविकात ग्रामीण व शहरी भागातील ग्राहकांनी महोत्सवास भेट देऊन महोत्सव यशस्वी केल्याबद्दल आभार मानले. डॉ.रंजन वानखडे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी, तंत्रज्ञान, प्रक्रिया मार्फत नफा वाढ, एकात्मिक शेती पद्धती, जिल्हास्तरीय पिक स्पर्धेत सहभाग घेऊन प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त शेतकरी, महिला व महिला बचतगट तसेच महोत्सवातील उत्कृष्ट स्टॉलधारकांचा पारितोषिक प्रदान करून गौरव करण्यात आला. शेवटी कृषी उपसंचालक तेजस चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमास शेतकरी, स्टाँलधारक, विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….