दिवसभर चटके अन् रात्री गारवा….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता जाणवू लागली होती. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून दिवसभर उन्हाचे चटके तर रात्री गारवा सुटत असून, तो सकाळपर्यंत जाणवत आहे.
त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉक करणारेही पहाटे पडलेल्या थंडीचा आनंद घेत आहेत. दिवसभर सूर्य तापत असून, दुपारी घाम फोडत आहे. या बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांसह वृद्धांमध्ये ताप, खोकला, सर्दीचे रुग्ण वाढत असल्याचे डॉ. प्रशांत आंधळे यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून सर्वत्र दिवसाचा पारा वाढला असून सरासरीपेक्षा तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच होळीनंतर पुढील आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचे चटके आणखी तीव्र होणार आहेत. सध्या दिवसा चटके लागत असले तरीही रात्रीचा गारवा मात्र कायम आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे डॉ. किरण बालगुडे यांनी सांगितले.
हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार पुरंदर तालुक्यात आकाश स्वच्छ असून वातावरण कोरडे आहे. सकाळपासून सूर्याचे तापमान अधिक होत आहे. मार्चच्या दुसर्या आठवड्यात तापमान त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीला वेग आला असून, शेतकरी व मजूर दिवसभर उन्हात काम करीत आहेत.
एप्रिल-मे महिन्यात सूर्य आणखी आग ओकणार
या वर्षी उन्हाळ्यातील मार्च, एप्रिल, मे महिन्यांत सूर्य आग ओकणार असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उन्हासोबतच नागरिकांना पाणीटंचाईचे चटके बसणार आहेत, यात शंका नाही. त्यामुळे प्रशासनाने पाणीटंचाई निवारणासाठी आतापासूनच तयारी करणे गरजेचे आहे.
– डॉ. अजित रजपूत, वाल्हे’आता उन्हाळ्याची चाहूल लागली असून कडक ऊन पडत आहे. अचानक ऊन तापल्याने व रात्रीचा गारवा कायम राहिल्याने लहान मुले, वयोवृद्ध नागरिक आजारी पडत आहेत. त्यामुळे आजारी व्यक्तींनी अंगावर दुखणे काढू नये. स्वतः गोळ्या-औषधी न घेता जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधोपचार करून घ्यावे.’

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….