विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच; ‘ही’ तीन नावं चर्चेत, कोणाचं पारडं जड?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “विधान परिषदेच्या पाच आमदारांची विधानसभेवर निवड झाल्याने रिक्त झालेल्या या पाच जागांसाठी 27 मार्चला पोटनिवडणूक होणार आहे. प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक होणार असल्याने पाचही जागा महायुतीला मिळणार आहेत.
भाजपला तीन तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळणार आहे.
विधान परिषद सदस्याची लोकसभा अथवा विधानसभेवर निवड झाल्यास त्याचे विधान परिषद सदस्यत्व आपोआपच रद्द होते. प्रवीण दटके, रमेश कराड, गोपीचंद पडाळकर (भाजप), राजेश विटेकर (राष्ट्रवादी अजित पवार), आमश्या पाडवी (शिवसेना शिंदे ) या विधान परिषदेच्या पाच आमदारांची विधानसभेवर निवड झाली. पाचही जणांची आमदारकी संपुष्टात आल्याने पाच जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 10 ते 17 मार्च या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येणार आहे. या एका जागेसाठी सर्वात आघाडीवर संग्राम कोते पाटील यांचे नाव असल्याचे बोलले जात आहे. संग्राम कोते पाटील हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष राहीले आहेत. त्यांनी युवक प्रदेशाध्यक्षपदाची ही जबाबदारी स्वीकारली होती. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेबाहेर होती त्यावेळी त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून लाखो युवकांना रस्त्यावर उतरवले होते. 2014 ते 2019 याकाळात त्यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढत साडेतीन लाख किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला होता. 124 मोर्चे त्यांनी काढले. आपण केलेल्या या कार्याची दखल अजित पवार घेतील अशी अपेक्षा ही संग्राम कोते पाटील यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे संग्राम कोते पाटील यांचे मामा आहेत. थोरातांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये संधी असतानाही कोते पाटील यांनी अजित पवारांनाच साथ दिली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते अजित पवारांबरोबरच राहीले. त्यामुळे विधानपरिषदेच्या रिक्त जागेवर त्यांना दावा केला आहे.
कोते पाटील यांच्या प्रमाणेच झीशान सिद्दिकी आणि आनंद परांजपे यांच्या नावाची ही चर्चा सुरू आहे. झीशान हे काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आले आहेत. ते मुळचे राष्ट्रवादीचे नाहीत त्यामुळे ते या स्पर्धेतून काही मागे पडतील अशी चर्चा आहे. तर आनंद परांजपे यांचा नेत्यांच्या भोवती चांगला वावर असतो. शिवाय ठाण्यात आव्हाडांना आव्हान देण्यासाठी परांजपेंना ताकद दिली जाते का हे ही पाहावे लागणार आहे. मात्र सध्याच्या स्थितीत संग्राम कोते पाटील यांचे पारडे जड दिसत आहे, अशी राजकीय वर्तूळात चर्चा आहे.
दरम्यान, विधानसभेत महायुतीचे 237 ऐवढ्या आमदारांचे प्रचंड संख्याबळ आहे. त्यामुळे महायुतीचे पाचही आमदार निवडून येण्यास कुठलीही अडचण नाही. पाचपैकी तीन जागा या पुढील वर्षी मे महिन्यात रिक्त होणार आहेत. तर बाकीत्या दोनपैकी एक जागा 2030 पर्यंत आहे. तर दुसरी जागा 2028 पर्यंत आहे. यातील तिघांना वर्षभरापुरतीच आमदारकी मिळणार आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….