धनुभाऊ अखेर मंत्रिमंडळातून गेट आऊट, राजभवनातून आली मोठी बातमी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातील पुरावे असलेले फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्र सुन्न झाला होता. वाल्मिक कराडच्या गँगने संतोष देशमुख यांना क्रूरपणे मारहाण केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
या प्रकरणी अखेरीस राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता अधिकृतरित्या धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून सुट्टी झाली आहे. राज्यपालांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मंजूर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आज सकाळी धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला होता. विशेष म्हणजे, त्याआधी सोमवारी संध्याकाळी संतोष देशमुख यांच्या हत्येच्यावेळीचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला झाला होता.
धनंजय मुंडेंनी दिलं प्रकृती ठीक नसल्याचं कारण
सकाळी अधिवेशनाच्या आधीच धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपला राजीनामा दिली. त्यानंतर धनंजय मुंडेंनी ट्वीटकरून राजीनामा देण्याचं कारण सांगितलं.
‘बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झालं, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसंच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….