फडणवीस सरकारला भिडण्यासाठी ठाकरेंचा खास माणूस, नावही फायनल पण पवारांच्या राष्ट्रवादीची एक अट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला मिळणार असून भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. भास्कर जाधव हे आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते असतील. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दावा केला असून तशा आशयाचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना देण्यात येणार आहे.
विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधवांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. विधानसभा अध्यक्षांकडे महाविकास आघाडीचे पत्र पोहोचलं असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे शिष्टमंडळ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भेटीला गेले. यावेळी आदित्य ठाकरेंसोबत भास्कर जाधव, सचिन अहिर, अंबादास दानवे व इतर नेते उपस्थित होते.
भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब
विधानसभा विरोधी पक्ष नेते पदासाठी शिवसेना ठाकरे गटाचे विधान सभा गट नेते भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, जीतेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील नेत्यांच्या चर्चेत महाविकास आघाडीने भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडेही विरोधी पक्ष नेतेपदासाठी महाविकास आघाडीचे पत्र पोहचले असल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडीचा अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला फायनल
विधानसभा विरोधी पक्ष नेता पदासाठी महाविकास आघाडीचा अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला फायनल झाला आहे. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपद आपल्याला मिळावं अशी मागणी काँग्रेसने केल्याची माहिती आहे. विधानपरिषद विरोधी पक्ष नेता पद काँग्रेसकडे जाणार आहे. विधानसभा विरोधी पक्ष नेता पद शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना अडीच अडीच वर्ष विभागून देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. विरोधी पक्षनेतेपद अडीच अडीच वर्ष राहाव, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत करण्यात आली आहे,

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….