महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 5 जागांसाठी 27 मार्चला मतदान होणार आहे. त्यामुळे आता या रिक्त जांगावर कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
विधानसभेच्या निकालानंतर विधानपरिषदेच्या 5 जागा रिक्त झाल्या होत्या.
या निवडणुकीसाठी उमेदवारांना 10 मार्च ते 17 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहे. तर 18 मार्च रोजी अर्जांची छाननी होणार आहे. तर 20 मार्च रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे आणि 27 मार्च रोजी विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान होणार आहे.
शिवसेना आमदार आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर, भाजप आमदार प्रवीण दटके, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजप आमदार रमेश कराड विधानसभा निवडणुकीत जिंकल्याने विधानपरिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या होत्या तर आता पाच जागांवर 27 मार्च रोजी मतदान होणार आहे. महायुतीकडून या निवडणुकीमध्ये कुणाला संधी मिळणार याबाबत आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
विधान परिषद निवडणूकीसाठी कार्यक्रम
10 मार्च ते 17 मार्च अर्ज भरण्याची प्रक्रिया
18 मार्च : अर्ज छाननी प्रक्रिया
20 मार्च : अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
27 मार्च : मतदान

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….