सागर’चं गेट बंद, तानाजी सावंत ताटकळत दारात, मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मंत्रिपदाने हुलकावणी दिल्याने नाराज असलेले माजी मंत्री तानाजी सावंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले. मात्र त्यांना बंगल्याच्या प्रवेशद्वारावरच थांबविण्यात आले.
काही वेळ त्यांनी प्रतिक्षा केली खरी पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना भेट नाकारल्याचे वृत्त आहे. जवळपास तीन मिनिटे तानाजी सावंत हे सागर बंगल्याच्या प्रवेशद्वारावर उभे होते.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मंत्रिपदाच्या काळात घेतलेल्या निर्णयावर आत्ताच्या सरकारने चौकशीचे आदेश दिल्याचे वृत्त होते. तसेच सरकारमध्ये असताना तानाजी सावंत यांनी काही कंत्राटांची निविदा काढली होती. आर्थिक तरतूद नसताना देखील या कामाची निविदा काढण्यात आली असल्याची माहिती आहे. त्याचमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित निविदेला स्थगिती दिल्याची चर्चा आहे. त्याचमुळे सावंत कमालीचे नाराज आहेत.
तानाजी सावंत ताटकळत फडणवीस यांच्या दारात, मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली?
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी तानाजी सावंत पूर्णपणे गैरहजर होते. मात्र सोमवारपासून (आज) सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला तानाजी सावंत यांनी उपस्थिती लावली. पहिल्याच दिवशी त्यांनी कामकाजात सहभाग नोंदवला. विधानसभेचे कामकाज आटोपल्यावर ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर गेले.
मात्र त्यावेळी देवेंद्र फडणवीस भाजपच्या इतर मंत्र्यांसोबत बैठकीत व्यस्त होते. सागर बंगल्याच्या प्रवेशद्वारावरच तानाजी सावंत काही वेळ होते. मात्र काही मिनिटांत त्यांना भेट नाकारल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हिरमुसलेले सावंत भेटीविना माघारी वळले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून भाजपच्या मंत्र्यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण
दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांना आज स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले आहे. संध्याकाळी साडे सात वाजता सगळ्या मंत्र्यांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्नेहभोजन करतील.
स्नेहभोजनसाठी कोण कोण पोहोचले?
अशोक उईके
पंकजा मुंडे
चंद्रकांत पाटील
राधाकृष्ण विखे पाटील
चंद्रशेखर बावनकुळे
मंगलप्रभात लोढा
अतुल सावे
गणेश नाईक
शिवेंद्र राजे
माधुरी मिसाळ
पंकज भोयर
जयकुमार रावल
नितेश राणे
मेघना बोर्डीकर
गिरीश महाजन
आशिष शेलार
राहुल नार्वेकर
राम शिंदे

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….