काँग्रेस विधानसभा मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख, विधान परिषद गटनेतेपदी सतेज पाटील….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज (दि.१) काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांची घोषणा केली . या संदभातील माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म X अकाऊंटवरून दिली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांच्या नियुक्त्या केल्या जाहीर केल्या. यामध्ये विधानसभा उपनेते म्हणून अमीन पटेल, विधानसभा मुख्य प्रतोद – अमित देशमुख, विधानसभा सचिव, विधानसभा प्रतोद – शिरीषकुमार नाईक आणि संजय मेश्राण. तर विधानपरिषद गटनेतेपदी सतेज ऊर्फ बंटी पाटील (पुर्ननियुक्ती) , विधान परिषद मुख्य प्रतोद- अभिजीत वंजारी तर प्रतोदपदी राजेश राठोड या काँग्रेस नेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या सर्व विधानसभा आणि विधान परिषद नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे आभार मानत भावी वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….