पोलीस पथकावर गोळी झाडणारा आरोपी गोळीबारातच जखमी, नांदेड शहराजवळील थरारक घटना….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड :- “सिडको भागात एकावर तलवारीने हल्ला करून फरार झालेल्या अविनाश ऊर्फ भैय्या मिरासे या फरार आरोपीने बुधवारी मध्यरात्री पोलीस पथकावर आपल्या गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्यानंतर प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हा आरोपी जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार केले जात आहेत.
त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलीकडच्या काही दिवसात नांदेड शहर गोळीबाराच्या घटनांमुळे गाजत असतानाच बुधवारच्या रात्रीची थरारक घटना समोर आली. स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अविनाश मिरासे याने बुधवारी दुपारी सिडकोजवळच्या दत्तनगर भागात कृष्णा बावरी याच्यावर तलवारीने हल्ला करून त्यास जखमी केले होते. या प्रकरणी मिरासे याच्याविरुद्ध भारतीय संहितेतील कलम १०९ अनुसार गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता.
बुधवारी रात्री आरोपी अविनाश हा आपल्या दोन साथीदारांसह झरी गावाजवळच्या खदान परिसरात मद्यपान करत बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर स.पो.नि. पांडुरंग माने, फौजदार पुयड व त्यांचे पथक खदानीजवळ गेले असता मिरासे याने आपल्याकडील गावठी पिस्तुलातून त्यांच्या दिशेने गोळी झाडल्यानंतर प्रसंगावधान राखत एपीआय माने यांनी त्याच्या दिशेने झाडलेल्या दोन गोळ्यांपैकी एक गोळी त्याच्या पायाला लागल्यामुळे तो जखमी अवस्थेत पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर पोलिसांनी मिरासे याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….