१९८४ च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “1984 च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने ही शिक्षा (Court) सुनावली आहे. न्यायालयाने 21 फेब्रुवारी रोजी शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला होता. पीडितेच्या बाजूने सज्जन कुमारला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने सज्जन कुमारला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 1984 च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणात न्यायालयाने सज्जन कुमारला 12 फेब्रुवारी रोजी दोषी ठरवले होते.
1984 च्या शीख विरोधी दंगली प्रकरणात दोषी ठरलेले माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांना राऊस अव्हेन्यू कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सज्जन कुमार आधीच दिल्ली कॅन्टमंट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. 1 नोव्हेंबर 1984 रोजी दिल्लीतील सरस्वती विहार भागात दोन शीख जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी आज न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली.
या घटनेशी संबंधित एफआयआर उत्तर दिल्लीतील सरस्वती विहार पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. रंगनाथ मिश्रा आयोगासमोर तक्रारदारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला. 12 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले.
दिल्ली पोलिसांची मागणी काय होती?
दिल्ली पोलीस आणि पीडितांनी या प्रकरणात सज्जन कुमार यांच्या मृत्युदंडाची मागणी केली. मात्र, न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. निकालापूर्वी सज्जन कुमार यांनी शिक्षेत सौम्यता आणण्यासाठी अपील केले होते. त्यांनी त्यांच्या युक्तिवादात म्हटले की, या प्रकरणात मला मृत्युदंड देण्यास कोणताही आधार नाही. मी 80 वर्षांचा आहे. वाढत्या वयामुळे मला अनेक आजारांनी ग्रासले आहे. मी 2018 पासून तुरुंगात आहे. तेव्हापासून मला कोणतीही रजा/पॅरोल मिळालेली नाही.
ते म्हणाले, 1984 च्या दंगलीनंतर मी कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात सामील नाही. तुरुंगात माझे वर्तन नेहमीच चांगले होते. माझ्याविरुद्ध कोणतीही तक्रार आली नाही. त्यामुळे माझ्यात सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी तीन वेळा खासदार राहिलो आहे. मी समाजकल्याणाच्या अनेक प्रकल्पांचा भाग आहे. मी अजूनही स्वतःला निर्दोष मानतो. या प्रकरणात, न्यायालयाने मानवी पैलू लक्षात घेऊन त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….