मला मारहाण करणारा कराड तुरुंगात सडतोय, धनंजय मुंडेलाही भोगावं लागणार,करुणा शर्मांचा संताप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “बाथरुमला येईपर्यंत वाल्मिक कराडने मला मारहाण केली. आता, तुरुंगात सडत आहे. आयुष्यभर तुरुंगातच सडावं लागणार आहे. धनंजय मुंडेवरही तीच वेळ येणार असल्याचे करुणा शर्मा यांनी म्हटले.
लोकांची जमीन हडपण्याचा प्रकार असो, महिलांवर अत्याचार करणे असो या सगळ्यांचे पुरावे मी देणार आहे. मी याविरोधात आझाद मैदानावर उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही करुणा शर्मा यांनी दिला आहे.
सुप्रिया सुळेंची घेतली भेट…
करुण शर्मा मुंडे यांनी गुरुवारी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना मनातली खदखद व्यक्त केली. सुप्रिया सुळे यांच्यासोबत काही मुद्यावर चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या कारमध्ये कशाप्रकारे रिव्हॉल्व्हर ठेवण्यात आली. पोलिसांचा गैरवापर करत मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला. अजित पवार गटात भ्रष्ट मंत्री असल्याचे सुप्रिया सुळेंना सांगितले असल्याचे करुणा शर्मा यांनी सांगितले. पुण्यातील लोकांची जमीन धनजंय मुंडे खाल्ली असून त्यांना घेऊन सुप्रिया सुळेंची भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन पैशांची किंमत नसलेल्या कराडकडून मारहाण…
करुणा शर्मा यांनी सांगितले की, वाल्मिक कराड हा दोन पैशांची किंमत नसलेला गुंड आहे. त्याने मला 8 महिन्यांपूर्वी मारले होते. मला बाथरुमला येईपर्यंत तो मला मारत होता. या राजकारण्यांनी न्याय केला नाही तर देव न्याय करेल. वाल्मिक कराड याने मला मारुन आठ महिनेही झाले नसतील आता तो जेलमध्ये सडतोय. त्याच्यासोबत लवकरच धनंजय मुंडेही तुरुंगात जाणार आहे. लोकांची जमीन हडपण्याचा प्रकार असो, महिलांवर अत्याचार करणे असो या सगळ्यांचे पुरावे मी देणार असल्याचे करुणा शर्मा यांनी सांगितले.
‘त्या’ घटनेचे सीसीटीव्ही फूटेज हवंय…
सनदी अधिकारी दीपा मुधोळ या जिल्हाधिकारी असताना जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीत वाल्मिक कराड आणिधनंजय मुंडे उपस्थित होते. पोलीस अधिकारी देखील होते. त्या ठिकाणी वाल्मिक कराडने मला सगळ्यांसमोर मारहाण केली. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज धनंजय मुंडे यांच्यामुळे मला मिळाले नसल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला. मला हे सीसीटीव्ही फूटेज मिळाले पाहिजे अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….