स्व.बाबाराव लेवेकर पैलवान स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी..!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- येथील स्व .बाबाराव लेवेकर पैलवान स्मृर्ती प्रतिष्ठानच्या वतीने ईटावा वार्ड सप्तशृंगी मंदिराच्या प्रांगणात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम मान्यवराच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पुष्प अर्पण करीत पूजन करण्यात आले.
स्व.बाबाराव लेवेकर पैलवान स्मृर्ती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद भाऊ मैन्द हे होते.प्रमुख पाहुणे ॲड.भारत जाधव, किरण देशमुख, पंडित देशमुख, सौ शुभांगी पानपट्टे, शिवसेना तालुकाप्रमुख संजयजी बयास ,शिवसेना शहर प्रमुख दीपक उखळकर, तिरुपती डेव्हलपर्स अँड बिल्डर्स संचालक आनंद शिरामवर व राजेश पिवळटकर हे उपस्थित होते.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रगरागिनी महिलांचा शाल शिरफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवराच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला. यावेळी योग शिक्षिका सौ. विजयाताई चव्हाण यांना योगा करिता सन्मानित करण्यात आले. तसेच सौ.अरुणाताई जाधव यांना सामाजिक कार्यात योगदान दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष सौ. उज्वलाताई खंदारे यांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अंगणवाडी सेविका सौ. संगीताताई पवार, छायाताई घोडेकर,गोकर्णाताई बोंबले व संगीताताई मुजमुले यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सौ.अर्चनाताई राजेश शिंदे यांचा गॅझेटेड ऑफिसर व ईटावा वार्डातील प्रथम नोटरी म्हणून सत्कार करण्यात आला, महिला पत्रकार सौ रेश्मा ताई यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विशाल जाधव सर व श्री कापसे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन स्व. बाबाराव लेवेकर पैलवान प्रतिष्ठानचे संचालक रमेश चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या वेळी उद्योगपती नारायण चव्हाण, श्री अनिल चव्हाण पाटील शिवसेना शहर संघटक,अरविंद कांबळे, अमोल वानखेडे, गायमुख नगर ग्रामपंचायत सदस्य विनोद चव्हाण, गब्बर राठोड, विजय राठोड , दशरथ राठोड, शालिकराम पाटील सुशांत कदम श्रीकांत मोरे गजानन गडदे पिंटू चव्हाण संजय शिंदे ॲड.राजेंद्र शिंदे अखिलेश गावंडे जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सदस्य तसेच पत्रकार बांधव यांचे सह मोठ्या संख्येनी मान्यवर नागरिक उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….