मी धक्कापुरुष झालोय; कोण किती धक्के देतंय ते पाहूयात; उद्धव ठाकरेंचं विधान चर्चेत…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “कोकणातील उद्धव ठाकरे यांचे जवळचे शिलेदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील अनेक अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही उद्धव ठाकरेंना सोडून गेले.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातील अनेक नेते सातत्याने पक्षाला रामराम ठोकून जात असल्याने उद्धव ठाकरेंना धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अशातच आता उद्धव ठाकरेंनी एक विधान केलं आहे, ते म्हणाले अशा धक्क्यांमुळे मी आता धक्कापुरुष झालोय. कलीना मतदारसघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज मातोश्रीवर जमले होते. त्यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
माझी जपानसारखी परिस्थिती झाली आहे. जपानमध्ये असं म्हणतात की एखाद्या दिवशी भूकंपाचा धक्का बसला नाही की त्यांना आश्चर्य वाटतं. उद्धव ठाकरेंना एवढे धक्क्यावर धके बसले आहेत, की मी आता धक्कापुरुष झालोय. कोण किती धक्के देतंय ते पाहूयात. आपण असा धक्का देऊया पुन्हा हे दिसता कामा नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ते पुढे बोलताना म्हणाले, एखादा निर्णय घेतल्यावर नाराजी असतेच. पण सैनिक म्हटल्यावर शिस्त आली पाहिजे. लढाई एकट्या दुकट्याची नाही ही लढाई आपली आहे. सगळ्यांनी छावा सिनेमा आवर्जून बघा. जे जे लोक बाहेर येतात ते डोळे पुसत बाहेर येत आहेत. डोळे उघडून सर्वांनी हा पिक्चर बघा, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, संघटनात्मक बांधणी करण्याचे आताचे दिवस आहेत. सुप्रीम कोर्टातील निकाल लागण्याची शक्यता आहे. २७७ किंवा २३६ चा निकाल लागेल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल-मे मध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. मग सर्वांना दिलेले ती काम सर्वांनी करा. शाखेनुसार काम करा. विधानसभेत जो अनुभव आला तो अनुभव लक्षात घेता जी चूक झाली ती आता चूक होणार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….