ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्तांच्या नव्या कायद्यांतर्गत नियुक्त पहिले मुख्य निवडणूक आयुक्त….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “ज्ञानेश कुमार यांची भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून नियुक्ती झाली आहे. ते राजीव कुमार यांची जागा घेणार आहेत. नव्या कायद्यांतर्गत नियुक्त होणारे ते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त ठरले आहेत.
ज्ञानेश कुमार हे १९८८ बॅचचे केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांना मार्च २०२३ मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नेमण्यात आले होते. आता ते तीन सदस्यीय निवडणूक आयोगाचे नेतृत्व करणार आहेत. आयोगातील अन्य सदस्यांमध्ये उत्तराखंड कॅडरचे अधिकारी सुखबीर सिंह संधू यांचा समावेश आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात २०२४ मध्ये बिहार विधानसभेची निवडणूक तसेच २०२५ मध्ये पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूमधील विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….