धनंजय मुंडेच्या राजीनामाचे अधिकार अजित पवारांना ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार सुरेश धस यांच्या पाठिशी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्या भेटीवरुन चर्चा रंगली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवणारे आमदार सुरेश धस हे मंत्री धनंजय मुंडे यांनी भेटल्यामुळे मनोज जरांगेसह विरोधकांनी आमदार धस यांना लक्ष केले आहे.
या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावातून प्रतिक्रिया देत विरोधकांना टोलवले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, हा हेतू ठेवून आमदार सुरेश धस काम करत आहे. या प्रकरणात ते पुढाकार घेत असल्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.
असे राजकारण असू नये
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोण कुणाला भेटले याच्यावर जर अशा पद्धतीचा राजकारण होत असेल तर लोकशाहीमध्ये ते योग्य नाही. लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे. सुरेश धस यांनी या प्रकरणांमध्ये गंभीर भूमिका घेतलेली आहे. ती सर्वांनी बघीतली आहे. ते गंभीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातून संवादच तोडून टाकायचा असे करणे योग्य नाही. शेवटी धनंजय मुंडे हे सुद्धा राज्याचे मंत्री आहेत. त्यामुळे एखादा आमदार, एखाद्या मंत्र्याला भेटला तर काही फरक पडत नाही.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….