एकनाथ शिंदेंची शिवसेना फुटणार? खासदाराची हिंट अन् महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा मूड सातत्यानं बदलत आहे. राजकारणात काहीच अशक्य नाही असं म्हटलं जायचं. पण आता या उक्तीचा प्रत्येय अलीकडच्या वर्षांत अख्ख्या महाराष्ट्राला येऊ लागलाय.
शिवसेना फुटली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फुट पडली. सध्याच्या स्थितीत कोण कोणत्या पक्षाचा नेता आहे हेच कळायला मार्ग नाही. मागील काळापासून असे एक ना अनेक राजकीय भूकंप राज्याच्या जनतेनं अनुभवले आहेत. आता आगामी काळात राजकारणात आणखी ट्विस्ट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्या दाव्यानं तर पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेनाच फुटणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत मोठा दावा केला आहे. येत्या काही दिवसांत शिंदेंची सेना भाजपत विलीन होईल, असा दावा राऊतांनी केला आहे. शिंदे सेनेचा एक गट कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वात भाजपमध्ये जाईल, असंही राऊत म्हणाले.
भाजप आणि एकनाथ शिंदे भविष्यात एकत्रित राहू शकत नाहीत. एकनाथ शिंदे यांचे काम झाले आहे. आता त्यांचं स्वतःचंच काम तमाम होणार आहे. त्यांना आणि त्यांच्या लोकांनाही हे माहीत आहे. त्यांचा पक्ष भाजपत विलीन होईल किंवा एक मोठा गट कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वात भाजपत जाईल. हे स्टॅम्पपेपरवर लिहून सही करून देतो, असं राऊत ठामपणे म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….