ईदच्या पार्श्वभुमीवर पुसद मधील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली राहणार : इंसिडन्स कमांडर यांचे आदेश
सकाळी १० ते दु.२ वाजेपर्यंत दिली मुभा ; किराणा, पिठगिरणी,भाजीपाला दुकानांना मुभा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रहेमान चव्हाण:9657176148
पुसद:
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुसद तालुक्यातील २८ जुलै व त्यानंतर तिन दिवस वाढवून ३१ जुलै पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहे.जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या संचार बंदीचे पालन नागरिक करीत असल्याचे तालुका प्रशासनाच्या निदर्शास आले आहे.मात्र संचार बंदी लागू असल्याने अवघ्या दोन दिवसावर येवून असलेल्या मुस्लिम बांधवांच्या पवित्र अश्या बकरी इद च्या पार्श्वभुमीवर अत्यावश्यक सेवेंची दुकाने वेळेचे बंधन घालून सुरू करण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाजाकडून करण्यात आली होती. यावर तहसीलदार तथा इंसिडन्स् कंमाडर यांनी गांभीर्य पूर्वक विचार करून ईदच्या पार्श्वभुमीवर पुसद तालुक्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवण्याचे आदेश बजावले आहे.मात्र त्यामध्ये वेळेचे बंधन घालत अत्यावश्यक सेवेंची दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत किराणा ,भाजीपाला,पीठ गिरणी, व अत्यावश्यक सेवेची दुकानांचा समावेश आहे.

सोशल डिस्टन्स पाळावे, एकाचवेळी गर्दी करू नये, तोंडाला मास्क लावून बाहेर पडावे अन्यथा बाहेर पडू नये, शासनाच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन पुसद तहसीलदार तथा इंसिडन्स् कंमाडर वैशाख वाहुरवाघे यांनी केले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….