दिलासा : इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर ; यापूर्वी 31 जुलै होती अखेरची तारीख
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं करदात्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं (सीबीडीटी) इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करदात्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं २०१८-१९ (असेसमेंट इयर २०१९-२०) या आर्थिक वर्षांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची तारीख ३१ जुलै वरून वाढवून ३० सप्टेंबर केली आहे. आयकर विभागानं यासंदर्भातील माहिती दिली आहे. नवे आणि रिवाईज्ड इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख तिसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे.करोनाच्या महामारीमुळे येणारे अडथळे आणि करदात्यांना सुलभपणे नियमांचं पालन करता यावं म्हणून २०१८-१९ (असेसमेंट इयर २०१९-२०) या आर्थिक वर्षांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवल्याचं आयकर विभागानं ट्विटद्वारे सांगितलं. सर्वात पहिल्यांदा रिटर्न दाखल करण्याची तारीख ३१ मार्च होती. त्यानंतर ही ती वाढवून ३० जून करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा ती मुदत वाढवून ३१ जुलै करण्यात आली होती आणि ती पुन्हा वाढवून ३० सप्टेंबर करण्यात आली आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…