महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या ६ महिन्यात मोठे भूकंप ; उद्धव ठाकरेंना बसणार धक्के…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाने कोकणासह मुंबईत शिवसेनेला ताकद मिळणार असून आता कोकणामधील एकही उबाठाचा पदाधिकारी त्यांच्यासोबत नाही. त्यामुळे त्यांनी आता जागं व्हावं नाहीतर पुढील ६ महिन्यात उबाठाचा अंत होणार असल्याची प्रतिक्रिया महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
तर राज्यामध्ये ऑपरेशन टायगर सुरू झालं असून आता हे ऑपरेशन थांबणार नसल्याचं देखील योगेश कदम यांनी सांगितलं. महसूल राज्यमंत्री योगेश कदम जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली.
राजन साळवी यांनी गुरूवारी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशावर बोलताना योगेश कदम यांनी सांगितले की, ‘मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालंय कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा रत्नागिरी जिल्हा आहे. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाने ग्रामीण कोकणात नव्हे तर मुंबईसारख्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत चांगला परिणाम होणार आहे. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाने मुंबईमध्ये देखील चांगली ताकद आम्हाला मिळणार आहे. जसा विधानसभेला विजय प्राप्त केला तसा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भगवा झेंडा नक्कीच आम्ही फडकवू.’
योगेश कदम यांनी यावेळी ठाकरे गटावर टीका करताना सांगितले की, ‘त्यांनी विचार केला पाहिजे त्यांच्याकडे असलेले आमदार तर निघून गेलेच आता माजी आमदार देखील निघून जायला लागले आहेत. त्यांचा एकही जिल्हाप्रमुख राहिला नाही, एकही तालुकाप्रमुख राहिला नाही. कोकणामधील एकही पदाधिकारी आज त्यांच्यासोबत नाही. आता तरी त्यांनी जागं व्हावं, नाहीतर त्यांचा अंत पुढील सहा महिन्याच्या आत होणार आहे.’
तसंच, ‘ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटात येणार असल्याची चर्चा आहे. ऑपरेशन टायगर तर चालू झालेलं आहे हे ऑपरेशन आता थांबणार नाही. आम्हाला ऑपरेशन करायची गरज पडत नाही समोरून आता अप्रोच होत आहे. उबाठाचे कार्यकर्ते आमच्यात येऊ इच्छितात आम्ही सगळ्यांचे स्वागत करणार आहोत.’, असे मत योगेश कदम यांनी व्यक्त केले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….