राज ठाकरेंना सोबत घेणार पण…; आदित्य ठाकरेंनी त्यासाठी कोणता प्रस्ताव ठेवला?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचं विशेष कौतुक केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंची तुलना थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याशी केली आहे.
एका जाहीर कार्यक्रमात बोलताना आशा भोसले एकनाथ शिंदेंना म्हणाल्या की, जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली, तशी तुम्हीही शिवसेना घडवली. यानंतर आता यावर राजकारण तापलं आहे. यावर आता आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
आशा भोसले म्हणाल्या होत्या की. पक्ष फुटी झाल्यानंतर सगळे एकनाथ शिंदेंवर धावून आले होते. त्यावेळेला तुम्ही सगळ्यांना तोंड दिलं. चांगलं कार्य करत राहिल्याने कोणीही, कधीही संपत नाही,” अशा शब्दांत आशा भोसले यांनी एकनाथ शिंदेंच्या कामगिरीचं कौतुक केलं. यानंतर यावर आदित्य ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहेत.
याला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, वयाचा मान ठेऊन गोष्ट सोडून द्यायची असते. मी जास्त खोलात काही गोष्टी वाचत नाही. हे काही घडले आम्हाला माहितीही नव्हते, असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया दिलाी आहे. तसेच ठाकरे बंधू एकत्र येण्यावरही त्यांनी मोठं भाष्य केले आहे.
ते म्हणाले की, काही विषय समजण्या पलीकडे असतात. गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमचा लढा सुरू आहे. आम्ही भूमिका बदलेली नाही. आम्ही रात्री हूडी घालून मुख्यमंत्र्यांना भेटत नाही. सर्वांसमोर मुख्यमंत्र्यांना भेटतो. सर्व मागण्या मीडियासमोर आम्ही मांडतो. पण काही पक्ष बिनशर्ट पाठिंबा देतात. कधी स्वबळावर लढतात. पण आमची भूमिका स्पष्ट आहे.
तुम्ही कितीही आम्हाला पाडायचा आणि फोडायचा प्रयत्न तयार करत राहा. पण आम्ही महाराष्ट्रासाठी लढणार आहोत. कितीही वार केला तरी आमचा महाराष्ट्राचा आवाज रोखणार नाही. पण जोपर्यंत ते महाराष्ट्राच्या हिताचे बोलत नाहीत. तोपर्यंत आम्ही समजोता करू शकत नाही. कधीकधी त्यांच्याकडून एकत्र येण्याची ऑफर दिली जाते. मात्र जो पर्यंत ते महाराष्ट्राच्या हिताचा विचार करत नाही. जो देश, संविधान, जपेल त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, असं आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….